अमरावती –
छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ,अमरावतीच्या मानद डॉक्टरेट पदवीने, अकोला येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी, कुलगुरू डॉ प्रकाश घवघवे, द्वारा सन्मानित होणार आहेत अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी लोक विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक गंगाधर नाखले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
समाजामध्ये दिवसेंदिवस रासायनिक खते,कीटक नाशके याचे वाढते प्रमाणाचे अवशेष हे अन्न,फळे,भाजीपाला इत्यादी आहार द्वारा शरीरात त्याचे अवशेष मुळे आज हृदयविकार, कॅन्सर ,किडनी फेलीवर, थायरॉईड गुडघेदुखी ,संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, पॅरालिसिस इत्यादी गंभीर आजार निर्मिती ही कृषी विभागाच्या रासायनिक शेतीची देणगी आहे.
गंभीर अशा आरोग्याच्या विषयाला स्वतः चे शेतात विविध प्रयोग करून नैसर्गिक शेती ची उपयुक्तता लोकनेते प्रकाश पोहरे यांनी आपले दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्र प्रकाश, साप्ताहिक कृषकोन्नती इत्यादी प्रसार प्रचाराच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती अभियान करणे साठी प्रवृत्त केले.
लोकनेते प्रकाश पोहरे यांच्या या नैसर्गिक शेती अभियानाच्या महान कार्याची दखल, महाराष्ट्र शासनाने वेळीच घेऊन राज्यात कार्यान्वित असलेल्या डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान चे अध्यक्ष पदी नियुक्ती करून आज महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हा मध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा,आत्मा अशा योजना कार्यक्रम राबवित आहे.
कानपूर उत्तर प्रदेश येथे सन १८९४ ला स्थापन असलेकी, अखिल भारतीय कुणबी, मराठा , कुर्मी क्षत्रिय महासभा आहे. भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकात्मता तर कृषी रत्न डॉ पंजाबराव देशमुख यांचे कृषि सह विविध विषयाचे मौलिक विचार सह अनेक महापुरुषांचे मौलिक विचार देशाचे २२ राज्यात गतिमान करीत आहेत. या महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष, मध्य प्रदेश शासनाचे,सेवा निवृत प्रधान सचिव, डॉ व्ही एस निरंजन IAS आणि सहकारी यांनी (झांसी उत्तर प्रदेश) लोक विद्यापीठाकडे केलेल्या शिफारशीनुसार, लोक विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळात मंजूर झालेल्या ठरावानुसार लोक नेते प्रकाश गोपाळराव पोहरे यांना अकोला येथील नेहरू पार्क च्या भव्य मैदानावर डॉपंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश घवघवे ,जागतिक बँकेचे कृषी सल्लागार व माजी कुलगुरू डॉ रमेश भाऊराव ठाकरे,सचिव सौ प्रतिमा देशमुख, कुलसचिव प्राध्यापक गंगाधर नाखले, महासंचालक डॉक्टर मंगेश देशमुख इत्यादींच्या शुभहस्ते अनेक मान्यवर यांचे उपस्थितीत मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.या पूर्वी हरित क्रांतीचे प्रणेते, डॉ एम.एस.स्वामीनाथन यांना मानद असे पदवी ने सन्मानित करण्यात आले होते असे ,लोक विद्यापीठाचे संचालक विस्तार( आकाशवाणी अकोला चे सेवानिवृत्त) शामराव विश्वासराव देशमुख यांनी प्रसिद्ध दिले आहे.
प्रा.गंगाधर नाखले
कुलसचिव
छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ, अमरावती.
