मालवण :
आचरा येथील बांधकाम व्यावसायिक श्री. अशोक काशिराम घाडी यांचे गुरूवार दि. १८ डिसेंबर रोजी हृदय विकारच्या तीव्र धक्काने दुःखद निधन झाले. ते मुत्युसमयी ६४ वर्षांचे होते. श्री. घाडी यांनी आचरा पचकौशीत आणि परिसरात एक प्रामाणिक घर बांधणी व्यावसायायिक म्हणून विश्वास संपादन केला होता. त्यांनी कित्येक गोरगरीब लोकांना अल्प दरात घरे बांधकाम करण्यात सहकार्य केले होते. तसेच कित्येकांना वेळोवेळी हस्ते,पस्ते मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. श्री. अशोक घाडी यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री. घाडी यांचा स्वभाव लोभसवाणा व परोपकारी होता.त्यांच्या पश्चात पत्नी शिल्पा, गिरीश, मंगेश, ओमकार असे तीन मुलगे, असून दोन विवाहित कन्या असा परिवार आहे. त्यांच्या आचरा येथील हिंदू स्मशानभूमी अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. श्री. घाडी यांच्या मुत्यूने माणुसकी जपणारा आणि सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या व्यावसायिकाला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.
