मांद्रे येथील महाकाळ देवस्थानचा जत्रोत्सव २९ डिसेंबरला
सावंतवाडी
मांद्रे मधलामाज येथील श्री महाकाळ देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २९ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.त्यानिमित्त सकाळी ८.३० वाजता अभिषेक,महापूजा,१०.३० वाजता सत्यनारायण महापूजा,महाआरती,तीर्थप्रसाद,महाप्रसाद होईल.रात्री ९.३० वाजता पावणी,त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा ” धर्मविजय ” हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन श्री महाकाळ देवस्थान कार्यकारी कमिटी मांद्रे यांनी केले आहे.
