You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवा 24×7 उपलब्ध करण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवा 24×7 उपलब्ध करण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवा 24×7 उपलब्ध करण्याची मागणी

मागणी मान्य न झाल्यास आझाद मैदानात लाक्षणिक उपोषणाचा इशारा – बाळासाहेब सावंत, जिल्हा आरोग्य हक्क समिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 108 रुग्णवाहिका सेवेला सर्व जिल्हा उपरुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य व 24×7 उपलब्ध करून देण्यात यावे, अशी ठाम मागणी जिल्हा नागरिक आरोग्य हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात प्रथम मा. जिल्हाधिकारी महोदया तसेच मा. महाराष्ट्र सरकार यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे निवेदन सादर करण्यात येणार आहे. मात्र ही मागणी विनाविलंब मान्य न झाल्यास, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे पदाधिकारी बाळासाहेब सावंत यांनी दिला आहे.

या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सन्माननीय पत्रकार, समाजसेवक व आरोग्य स्वयंसेवक यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बाळासाहेब सावंत
जिल्हा आरोग्य हक्क समिती
मो. 8082600632

प्रतिक्रिया व्यक्त करा