*वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात संविधान सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न*
कणकवली
भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही मानवमूल्ये अंतर्भूत आहेत,असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमात बोलताना केले.ते संविधान सप्ताह निमित्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो,कारण या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते.या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे,त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आश्रम करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले भूमिका ओळखणे होय.
यानिमित्त प्रशालेमध्ये 1)संविधान विषयक चित्रकला स्पर्धा,यामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून संविधानाचा आशय स्पष्ट केला.
2)संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन,
3)प्रभात फेरी
4)मुख्य म्हणजे मानवी साखळी निर्मिती
5)संविधानावर आधारित गाणी अशा अनेक उपक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.सर्व विद्यार्थ्यांनी अगदी हिरिरीने भाग घेत देशाबद्दल असणारे प्रेम आपुलकी,आदर व्यक्त केले.
प्रभात फेरी काढताना देशाभिमानाच्या घोषणा उत्साहाने दिल्या.,”संविधान आमचा अभिमान ,देश आमचा मान ” “हक्काबरोबर कर्तव्यांची जाण”अशा घोषणांमधून देशप्रेम एकात्मता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश दिला गेला.
