दौंड :
रेल्वे सीनियर इन्स्टिट्यूट सभागृहात रविवार दिनांक १४/१२/२०२५ रोजी श्री. विनय कुकडे लिखित ‘दौंड अतरंगी आणि अंतरंगी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी वाचक आणि स्नेहीजन एकत्र यावेत या उद्देशाने हे सार्वजनिक प्रकाशन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य विचारवंत प्रा. डॉ. मधुकर मोकाशी (सर) होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. दत्ताजी शेणोलीकर, सेवानिवृत्त हिंदी शिक्षक श्री. अजय. डी. वाघमारे (सर) आणि डॉ. सुमन कुलकर्णी उपस्थित होते. लेखक श्री.विनय कुकडे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
साहित्यिक विनय कुकडे यांच्या बालपणीचे आणि शालेय मित्र, ‘ Friends 4ever Group (१९८१)’, आणि ‘आमची दौंड – शेजोवि ‘ १९७९, “आम्ही दौंडकर” या व्हाट्सअप गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना साने यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य श्री.अरुण मेहेर, श्री. सुहास देशमुख, डॉ.प्रेमकुमार भट्टड, डॉ.राजेंद्र माने, कवीवर्य मा.बाबू डिसोझा कुमठेकर, कथा लेखिका सौ.माधुरी वैद्य डिसोजा, समिना काझी, हरीश कामत, विजयकुमार देशपांडे, भागवत पवार, नेमचंद क्षत्रिय, सामाजिक कार्य आणि महिला गृह व्यवसाय आघाडीवरील सौ शीला तिखे, सौ दिपा सोनकर, समाजसेवक श्री. रवींद्र जाधव, व्यावसायिक श्री. दौलत लुंड यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
याप्रसंगी विनय कुकडे आणि सौ.उज्जवला कुकडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप श्री.दीपक गटणे यांनी आभारप्रदर्शनाने केला.
या प्रकाशन सोहळ्याचे आणि स्नेह मेळाव्याचे संयोजन शिवजीभाई पोकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नातून यशस्वी केले.
