You are currently viewing साऊ! तू नसतीस तर!
Oplus_16908288

साऊ! तू नसतीस तर!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*साऊ! तू नसतीस तर!*

 

सावित्रीबाई ह्यांचे नाव भारतीय इतिहासात फार अभिमानाने व आदराने गौरवलेले आहे. एक सामान्य स्त्री जिद्दीने व मेहनतीने अजरामर कार्य करू शकते याचे ह्या बाई आदर्श ऊदाहरण आहे.

त्यांच्या आधीचा काळ फारच कठीण होता. स्त्रीसाठी तो मानसिक शारिरीक यातनांचा काळ होता.

स्त्रीला शिक्षण द्यावे अशी समाजाची कधीच तयारी नव्हती. ती फक्त “चूल व मूल’एवढ्यासाठी व “रांधा वाढा, ऊष्टी काढा, ” यासाठीच जन्माला आली आहे असा समज होता.

अजाणत्या वयात लग्न हा तर मोठाच मानसिक छळ होता. नवरा वेडसर, रोगीष्ट, व्यसनी, आळशीबेकार, नको असलेली बाळंतपणे मात्र लादणारा सहन करावा लागे. वंशाला दिवा हवा म्हणुन मुलगे होईपर्यंत बाळंतपणे सहन करावी लागत.

परंपरे नुसार वांझ, निपूत्रिक, विधवा, परित्यक्ता हे शिक्के कपाळी बसत व मग तिचे जिवन म्हणजे यातनाच असत.

एखादी आजारी आहे म्हणुन, काम येत नाही, मचलगा होत नाही अशा कोणत्याही कारणावरून माहेरी पोंचवत व दुसरे लग्न करून मोकळे होत व माहेरी या परित्यक्ता… सोडलेली.. स्त्रीला अपमानित जिवन जगावे लागे. समाज टोचत राही.

दिवसभर कूठेही पण स्त्रीला ऊंबरठ्याच्या आंतच डांबले जाई. ऊपासमार सतत कष्ट व बाळंतपणे यात कित्येक स्त्रीयांचा मृत्यू होई. पण दुसरे लग्न करुन पुरूष मात्र मोकळे होत. हुंड्यासाठी मारहाण, जीव घेणे तेव्हाही होत असे.

स्त्रीला सतत घरातीलच स्त्रीया धाकात ठेवत रूढी जाचक बंधने , परंपरा पाळायला लावत. सतत अवहेलना, टिका टोमणे तर पांचवीलाच पूजलेले असत. मारझोड नित्याचीच असे.

अक्षरश: स्त्रीला केवळ शिक्षण नाही म्हणुन अगतिक, परावलंबी, असहाय असं जिवन जगावे लागे.

त्या स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारक देशसेवेचे व्रत घेऊन धडाडीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत होते.

मार्ग वेगळे पण ‘पूर्ण स्वातंत्र्य’ हे एकच ध्येय होते.

त्यातील काही समाज आधी सुशिक्षित व्हावा मग तो आपोआपच सुधारेल अशा मताचे होते.

थोर समाजसेवक जोतिबा फूले हे त्यापैकी एक होते.

त्यातही समाजातील स्त्रीची ही स्थिती बदललीच पाहिजे. या मताचे ते होते. त्यासाठी स्त्री शिक्षण हे क्रांतीकारी पाऊल ऊचलायला हवे हे त्यांनी ओळखले.

स्वत”सुशिक्षित होऊन आपली पत्नी सावित्रीबाई हीला त्यांनी गुपचुप शिक्षण दिले.

आणि स्त्रीशिक्षणाची क्रांती ची मशाल तिच्या हाती देत निर्भयपणे ज्ञानयज्ञ चालू करायला निर्भय बनवले. स्वत:तिच्यापाठीशी खंबीरपणे ऊभे राहिले.

या कार्यात फातिमाबाई येऊन मिळाल्या. घरोघरी जाऊन मुलींना शाळेत यायला प्रवृत्त केले.

भिडेवाड्यात शाळा चालू केली. स्वत: शिकवायला सुरवात केली.

समाजाला हे अजिबात रूचणारे नव्हते कारण समाज पुरूष प्रधान होता.

त्यांनी प्रखर विरोध केला. सहन होणार नाही अशी टिका, टोमणे,अवहेलना सुरू केली. अंगावर शेणगोळे, चिखल, कचरा, धोंडे मारले.

परंतु शिकणार्या जिद्दी मुली, स्वत: साऊ, व त्यांचे समर्थक जरासुद्धा मागे हटले नाहीत. डगमगले तर नाहीतच.

धगधगती ही क्रांतीची मशाल व ज्ञानयज्ञ घेऊन आपल्या कार्यावर निर्भिडपणे पाय रोऊन ऊभे राहिले.

व्हायचे तेच झाले. सावित्रीच्या मुली शिकत राहिल्या. स्वातंत्र्य, समानता, अभिमान, स्वयं निर्णय शक्ती इ. चा अर्थ त्यांना समजू लागला. त्याप्रमाणे पाऊल टाकत पूढे गेल्या.

‌सुरवातीला हे प्रवाहाविरूद्ध पोहणे होते. दमछाक तर होणारच होती. परंतु जिद्द ,सातत्य,‌व मेहनत यांनी यश दिलं व सावित्रीबाईंच्या क्रांतीला तेजोवलय चढलं.

पूर्वी मुलगी झाली तर सर्व नाक मुरडत,…. आईला मारहाण टिका इ. तोंड द्यावे लागे… मुलगी मारून टाकण्याइतका अघोरीपणा करत.

पण शिक्षणाने वेगळीच क्रांती केली. शिक्षणाचे महत्व समाजमनावर पटवले गेले.

शिकलेल्या मुलींनी जाचक अनाठायी रूढी परंपरा झुगारल्या, स्वातंत्र्याचा ऊपयोग स्वत:चा पोषाख, राहाणी, अर्थार्जन, लग्नाचे वय व पसंती, मुल कधी व किती हवीत, अशा सर्वच क्षेत्रात करून स्वत:चे व्यक्तीमत्व ऊजळ केले.

अपवाद सोडला तर सर्वच मुली शिकतात व कमावत्या होतात. घरची जबाबदारी ऊचलतात. छान रहातात, छान बोलतात, आकर्षक दिसतात.

आईवडिलांना मदत करतात. लहान भावंडाना शिक्षणाला सहाय देतात.

पुरूषांच्या बरोबरीने त्या कोणत्याही क्षेत्रात… अगदी सागर ते अंतराळ अशा सगळ्या ठिकाणी जबाबदारीची अभिमानास्पद कर्तबगारी करतात. बक्षिसे, पुरस्कार शिश्यवृत्या मिळवतात.

आता मुलगी झाली तर ऊलट आईवडिलांना अभिमान वाटतो.

हे करूनही स्त्रीयांनी घरपण, मातृत्व, नातेसंबंध, समाजभान यात सुंदर सांगड घातली आहे.

एकप्रकारे समाजाचे हितच साधले गेले.

सरकारनेही “मुलगी शिकली कुटूंब शिकले.”अशी घोषवाक्य बनवले. स्त्रीयांना हक्क व अधिकार बहाल केले.

बक्षिसे, मानसन्मान जाहीर केले. गौरव समारंभ चालू केले.

आता तर मुलांच्या नावापूढे आधी आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव अशी सक्ती केली आहे.

यामुळे अभिमान, कौतुक व गर्व वाटेल अशा स्त्रीया जशा… ऊत्कृष्ट सर्जन, डाॉक्टर्स, इंजिनियर्स वैज्ञानिक, तंत्रज्ञ, लेखिका, कवयित्री, पत्रकार, वैमानिक, संरक्षकदल व पोलिसदलातील ऊच्च अधिकारी शिक्षक ,प्राध्यापक, अशा असंख्य क्षेत्रात स्त्रीया नाव व सन्मान मिळवत आहेत.

कलाकार सुद्धा पूढे आहेत.

जर सावित्रीने ते असिधाराव्रत स्विकारले नसते तर?

हे शिव धनुष्य पेलले नसते तर?

अक्षरशा: अंगावर नुसत्या विचाराने सुद्धा कांटा ऊभा रहातो. मन घाबरतं. छातीत धडधडतं.

आज कोणत्याही यशाच्या शिखरावर मानाने विराज झालेली स्त्री दिसलीच नसती.

समाजाच्या दबावाखाली दबूनच राहिली असती.

घर ,कुटूंब विचाराने संपन्न व स्वतंत्र झालेच नसते. वैचारिक दारिद्र्य, दिवाळखोरी तशीच राहिली असती.

आणि एकप्रकारे समाज पूढे न जाता मागासलेला राहिला असता. हा तोटाच होता.

खरंच सावित्रीबाई तुमच्या लेकींकडुन तुम्हाला मानवंदना .

समाजावर केव्हढेमोठे ऊपकार आहेत?

म्हणुनच इतिहासाने तुम्हाला ‘क्रांती ज्योती’म्हणुन गौरव केला आहे. तुमच्या ज्ञानयज्ञाची महती ओळखली आहे.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा