You are currently viewing फोंडाघाट–देवगड–निपाणी रोड रुंदीकरणासाठी झाडतोड सुरू; एकेरी वाहतूक लागू

फोंडाघाट–देवगड–निपाणी रोड रुंदीकरणासाठी झाडतोड सुरू; एकेरी वाहतूक लागू

फोंडाघाट–देवगड–निपाणी रोड रुंदीकरणासाठी झाडतोड सुरू; एकेरी वाहतूक लागू

फोंडाघाट
फोंडाघाट–देवगड–निपाणी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून रस्त्याच्या बाजूची मोठमोठी झाडे मशीनच्या सहाय्याने तोडण्यात येत आहेत. या कामामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कामाची सर्व जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने स्वीकारली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

हा प्रकल्प मंत्री नितेशजी राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून कामाच्या प्रगतीची स्वतः अजित नाडकर्णी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी केली. केवळ घरात बसून मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

लोकांच्या हितासाठी चूक असल्यास ती मान्य करून सुधारणा करण्याची भूमिका घेतली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. अशाच प्रकारचे काम करणारे आणि जबाबदारीने वागणारे लोक मंत्री नितेशजी राणे यांना आवडतात, असे मत व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा