वृत्तसंस्था:
निकम यांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांन 2 महिन्यापूर्वी स्वित्झर्लंडची कंपनी असणाऱ्या सिनजेंटा अॅग्रीकल्चर सायन्स अँज टेक्नॉलॉजीमधून 40 हजार रुपयांचं फुलकोबीचं बियाणं खरेदी केलं आणि ते एक एकर जमिनीमध्ये पेरलं. या बियाण्यातून त्यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीचं उत्पन्न घेतलं आहे. त्यांच्या मते सामन्या फुलकोबीपेक्षा यासाठी अधिक खर्च येतो.
लांबून जर या शेतात पाहिलं तर फुलांची लागवड केल्याचा भास होतो.
मीडिया अहवालांच्या मते अशाप्रकारे लागवड करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी आहेत. त्यांचं हे शेत आता पूर्णपणे तयार आहे.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील या प्रयोगाचे कौतुक केले आहे. त्यांनी देखील असे म्हटले आहे की, फुलकोबी सहसा पांढरी असते परंतु याठिकाणी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीची लागवड केली जात आहे. याची किंमत नियमित फुलकोबीपेक्षा जास्त आहे.
ही हायब्रिड फुलकोबी आरोग्यासाठी अतिशय फायद्याची आहे. याप्रकारच्या फ्लॉवरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लोह याशिवाय विटामिन ए, बी, सी आणि आयोडिनची अधिक प्रमाणात आहे. तुम्ही भाजी किंवा पराठे बनवण्यासाठी या फ्लॉवरचा वापर करू शकता.