You are currently viewing ‘तू म्हणजे ना’….

‘तू म्हणजे ना’….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’तू म्हणजे ना’….*

 

*तू म्हणजे ना*…

वाऱ्यावर लिहिलेलं माझं नाव

ढगात सापडलेलं सोनसळी सूर्यकिरण

आणि अचानक मनात येऊन

गालावर उमटलेलं हसू.

 

*तू म्हणजे ना…*

सकाळच्या कॉफीवर बसलेली

कोवळी ऊब,

जणू दिवसाला सुरुवात करणारं

एक गोड निमित्त.

 

*तू म्हणजे ना…*

एखाद्या जुन्या गाण्याच्या

मऊ लयीमध्ये दडलेली आठवण,

स्वर आणि सुर ऐकताच

मन तुझ्यात हरवून जातं

 

*तू म्हणजे…*

रात्रीच्या नीरवतेत

चांदण्यानी केलेला कोमल स्पर्श

जेव्हा सगळं शांत असतं

तेंव्हा ह्रुदय धडधडत असतं

 

*तू म्हणजे ना…*

माझ्या जगातला

तो छोटासा निरागस चमत्कार

ज्यामुळे प्रत्येक दिवस

प्रेमाने उजळून जातात.

 

*तू म्हणजे…*

माझ्या प्रत्येक‌‌ श्वासला अर्थ देणारी

एक सहज सुंदर हळवी

अंगाभोवती पिंगा घालणारी

वाऱ्याची झुळूक

 

*तू म्हणजे ना*

एकही शब्द न उच्चारता

हजार भावना व्यक्त करणारी

माझ्या लेखणीला भूरळ घालणारी

न‌ लाजता येणारी कविता

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा