अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात होणार आगमन…
सावंतवाडी
अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार आहे. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्त्ताराजे भोसले तिसरे यांच्या
पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य दर्शनच्या दौऱ्याअंतर्गत या पादुका सावंतवाडीत येत आहेत.
श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या. या पवित्र आणि आशयपूर्ण पादुका तिन्ही राज्यांतील प्रमुख नगरांत भाविकांच्या दर्शनासाठी ६ डिसेंबर पासून दौरा करणार आहेत. या दिव्य प्रवासात सातारा, फलटण, मिरज, सांगली, मुधोल, होंडा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व नगरांमध्ये भाविकांना कृपापादुकांचे दिव्य दर्शन घेण्याची अद्वितीय योग उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यात मंगळवार १६ डिसेंबर रोजी पवित्र पादुकांचे आगमन होणार आहे. या पादुकांची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांना या पादुकांचे दर्शन व कृपाआशीर्वादाचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १०:३० ते रात्री ८ आठ वाजेपर्यंत या पादुका राजवाड्यात असणार आहेत. स्वामींच्या कृपा पादुकांच्या दर्शनाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत भोसले यांनी केले आहे.
