जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर खेळाबरोबरच ज्ञान संपादन करा
श्री.एकनाथ नाडकर्णी यांचे दोडामार्ग हायस्कूलच्या क्रिडा महोत्सवात आवाहन!
दोडामार्ग
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जिद्द आणि चिकाटी हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे,खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे,जीवनात यश संपादन करायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर खेळाबरोबरच ज्ञानही संपादन करा,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष-श्री.एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग च्या दोन दिवसीय आयोजित शालेय क्रिडामहोत्सव कार्यक्रमात बोलताना आवाहन केले.
श्री.नाडकर्णी हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कसई दोडामार्ग नगर पंचायत च्या नगरसेविका तथा शिक्षण व आरोग्य सभापती -सौ.संध्या राजेश प्रसादी,सामाजिक कार्यकर्ते व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष -श्री.संजय गवस,मोरगांव ग्रा.पं.चे सरपंच-श्री.देविदास पिरणकर,प्रशालेचे मुख्याध्यापक-श्री.संजय पाटील सर,जेष्ठ शिक्षक़-श्री.रमाकांत जाधव सर,श्री.अनिल मांगले सर,क्रिडा प्रमुख -श्री.ए.एल.बामणीकर सर उपस्थित होते. ध्वजारोहण क्रिडांगणाचे श्रीफळ वाढवून श्री.नाडकर्णी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले,तर क्रिडा ज्योत सौ.संध्या प्रसादी यांचेहस्ते प्रज्वलीत करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक -श्री.रमाकांत जाधव यांनी,सुत्रसंचालन -श्री.जगदिश सावंत,तर आभार -श्री.ए.एच.उराडे यांनी केले.
