You are currently viewing रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

*रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश,

तब्बल ९० मुलांनी पटकावले मेरिट अवॉर्ड्स :*

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भरभरून यश मिळवत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तब्बल ९० विद्यार्थ्यांनी मेरिट अवॉर्ड मिळवत वेगवेगळ्या अवॉर्डवर स्वतःचे नाव कोरले. ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट डिसेंबरमध्ये असून त्यामधून विद्यार्थ्यांच्या अतुलनीय कामगिरीचे यश झळकले आहे. यात ‘ कोलाज मेकिंग काॅम्पिटिशन’ मध्ये इयत्ता ३ री मधील कु. आद्या कुंभार हिने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावत कॅमल कलरिंग किट व सुवर्ण पदक प्राप्त केले. इयत्ता ४ थी मधील कु. प्रार्थना नाईक हिने आर्ट मेरिड अवॉर्ड व चषक तर, कु. अधृत गोवेकर याने कांस्यपदक पटकावले. इयत्ता ५ वी मधील कु. वरद राणे याने सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ७ वी मधील कु. हर्ष साटेलकर याने सुवर्णपदक, तर कु. अस्मि प्रभू टेंडोलकर हिने कांस्यपदक पटकावले. इयत्ता ६ या मधील कु. निधी शिर्के हिने कांस्यपदक पटकावले. इयत्ता २ री मधील कु. मिहिरा खटावकर, कु. सावी शिरसाट, कु. नवेली जाधव या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. ‘कलरिंग कॉम्पिटिशन’मध्ये इयत्ता १ ली ची कु. प्रांशी सावंत व कु. पारस साधले यांनी सुवर्णपदक पटकावले. तर इयत्ता २ री ची कु. नवेली जाधव, कु. सावी शिरसाट, कु. मिहिरा खटावकर, कु. पर्णिका देसाई या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. तर, कु. श्रवी पावसकर हिने आर्ट मेरिट अवॉर्ड पटकावून चषक प्राप्त केले. इयत्ता ३ री मधील कु. कुशल सबनीस, कु. राधिका शेटकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. इयत्ता ४ थी मधील कु. वेद बेळगावकर, कु. स्वरा वालावलकर, कु. परिधी नाईक, कु. हिताली गावडे, कु. नाविण्या कोरगावकर, कु. अवधूत चितारी यांनी सुवर्णपदक व कु. अधिश गोवेकर याने रौप्य पदक प्राप्त केले. इयत्ता ५ वी मधील कु. निलया शिंदे हिने सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ६ वी राबिया जमादार हिने फायस्टार ब्रीलियंट अवॉर्ड पटकावून स्केचबूक, ग्रफिट पेन्सिल व रौप्यपदक पटकावले. कु. सक्षम ओटवणेकर, कु. निधी शिर्के, कु. प्रत्युशा घोगले, कु. गौरीश परब, कु. ऋतुजा पेडणेकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व कु. अवनी शेर्लेकर हिने रौप्य पदक पटकावले. इयत्ता ७ वी मधील कु. श्री कोरगावकर हिने हिने आर्ट मेरिट अवाॅर्ड पटकावून चषक प्राप्त केले. तर कु. हिना सारंग, कु. तनिष्क पवार व कु. पूर्वी आरोलकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच, ‘ फिंगर अँड थम मेकींग कॉम्पिटिशन’मध्ये इयत्ता १ ली तील कु. अर्णव पाटकर याने सुवर्णपदक व प्रिन्सी राजपुरोहित हिने उत्तेजनार्थ बक्षिस व सरप्राइज गिफ्ट मिळविले. इयत्ता २ री मधील कु. सावी कुडतरकर व कु. श्रवी पावसकर हिने सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ३ री मधील कु. रुद्र देसाई, कु. सायली बांदेकर यांनी सुवर्णपदक पटकावले व कु. आद्या कुंभार हिला कांस्यपदक प्राप्त झाले. इयत्ता ४ थी मधील आधिश गोवेकर याने सुवर्णपदक प्राप्त केले. इयत्ता ५ वी मधील कु. फेथ फर्नांडिस हिने एक्सलंट एफर्ट अवॉर्ड पटकावून वूडन मनी पिगी बँक व कांस्यपदक प्राप्त केले. कु. सई नाईक हिने सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ६ वी मधील कु. हिना बथानी हिला रौप्य पदक अवॉर्ड व कांस्य पदक प्राप्त झाले. इयत्ता ७ वी मधील हिना सारंग हिने रौप्य पदक प्राप्त केले. ‘ मास्क मेकिंग काॅम्पिटिशन’ मध्ये इयत्ता १ ली चा कु. पारस साधले याने कांस्य पदक प्राप्त केले. इयत्ता दुसरी मधील कु. विवान सावंत याने सुवर्णपदक व कु. वैदेही कुडाळकर हिने रौप्य पदक प्राप्त केले. इयत्ता ३ री मधील कु. राधेय मोरजकर याने सुवर्णपदक, इयत्ता ४ थी मधील कु. श्रीहान मुंज व इयत्ता ६ वी मधील कु. सक्षम ओटवणेकट याने रौप्य पदक पटकावले. ‘ हस्ताक्षर स्पर्धेत ‘ इयत्ता २ री मधील कु. सलोनी हावळ हिने सुवर्णपदक, कु. मिहिरा खटावकर हिने रौप्य पदक व कु. जय साठम याला उत्तेजनार्थ बक्षिस व सरप्राइज गिफ्ट मिळविले. ३ री तील कु. दर्ष राणा याने सुवर्णपदक, कु. वल्लभ राऊळ व कु. अभिनव गवस याने रौप्य पदक, तर कु. अवधूतराज चव्हाण याने कांस्य पदक पटकावले. इयत्ता ६ वी मधील कु. अवनी शेर्लेकर हिने सुवर्णपदक, कु. माझ पटेल याने रौप्य पदक व कु. ध्यानी बथानी हिने कांस्य पदक पटकावले. इयत्ता ७ वी मधील कु. पूर्वी आरोलकर हिने सुवर्णपदक प्राप्त केले. ‘ कार्टून मेकिंग कॉम्पिटिशन’मध्ये अनुक्रमे इयत्ता २ री तील कु. सतिश्र्वरन तेवर याने कांस्यपदक, इयत्ता ३ री तील कु. निधी पेडणेकर व इयत्ता ४ थी मधील कु. प्रार्थना नाईक हिने सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ५ वी मधील कु. कुशल तांडेल याला सुवर्णपदक तसेच इयत्ता ६ वी मधील कु. सरस नाईक याने सुवर्णपदक, कु. राबिया जमादार हिने रौप्यपदक व कु. भुवन दळवी याने कांस्यपदक पटकावले. इयत्ता ७ वी मधील कु. तनिष्क पवार याने कांस्यपदक पटकावले. ‘ स्केचिंग कॉम्पिटिशन’मध्ये इयत्ता २ री मधील कु. आराध्या बांदेकर व इयत्ता ४ थी मधील कु. सार्थक मालवणकर याने रौप्यपदक पटकावले. इयत्ता ६ वी मधील कु. भुवन पुंडलिक याने सुवर्णपदक, तर कु. राबिया जमादार व कु. पृथ्वीराज गवस या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक प्राप्त केले. ‘ कॅरिकेचर कॉम्पिटिशन’मध्ये इयत्ता ४ थी मधील कु. सार्थक मालवणकर याने कांस्यपदक पटकावले. ‘ टॅटू मेकिंग कॉम्पिटिशन’मध्ये इयत्ता ३ री मधील कु. राधेय मोरजकर व कु. रुद्र देसाई यांनी रौप्य पदक प्राप्त केले व कु. अरमान गवंडी याने कांस्यपदक पटकावले. इयत्ता ४ थी मधील कु. सार्थक मालवणकर याने सुवर्णपदक व कु. प्रार्थना नाईक हिने रौप्यपदक पटकावले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील कला विषयाच्या सहा. शिक्षिका सौ. सुषमा पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरील स्पर्धेतील यशस्वी नव्वद विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडले गेले आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावरती करणार आहेत. त्याचप्रमाणे, रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे प्रशालेस ग्लोबल स्कूल अवॉर्ड जाहीर केले गेले. प्रशालेच्या कला शिक्षिका सौ. सुषमा पालव यांना देखील जॅक्सन पोलॉक अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा