You are currently viewing खरा ..! ..पुणेकर मीच..!!

खरा ..! ..पुणेकर मीच..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खरा ..! ..पुणेकर मीच..!!*

 

मंदी नसतांना ही

बेरोजगार.. माझं होणं

पुणे शहरानं शिकवलं..मला

अस्सलं जिणं..दुपारचं झोपणं

 

मीच खरा पुणेकर

ओळखतं नाही मी

इथले पवित्र आत्मे…

जाणून घ्यायचं नाही

फिकीरही नाही मला

बुरसटलेली इथली तत्वे.

 

ओळखीचा चेहरा दिसला जरी

भावनांचा.. गोंधळ होत नाही

इथे भावनांना घालतात चुलीत

समोरचाही ..ओळख देत नाही

 

पुणेकराला ..गरज नसते

हळूच चोरपावलांनी येण्याची

इथे गल्लीबोळात ..संतमहात्मे

तेच घेतात काळजी.. या जीवांची

 

पुणेकरांना नसतो तसा

कुणाचा …फारसा लळा

बघता बघता मात्र ..सारे जमतात

जेव्हा वैकुंठावर पसरते मरणकळा

 

या शहराने शिकवली दुनियादारी

पुण्यावर ..जीवापाड प्रेम करतो

पुणेरीपण ..ठासून अंगात मुरलं

खरा पुणेकर ..स्वतःला समजतो

 

इथे नाही ..नागपूरात जन्मलो

इथचं आता..गुडबाय करणारं

महाराष्ट्रभर.. शिकलो ..वावरलो

गुलाबांना इथेचं पुण्यात सोडून जाणारं

 

बाबा ठाकूर धन्यवाद

ठाकूरी उवाच..माझं पुणेरीपण

सतरावी रचना..सादरीकरणाची

प्रतिक्रिया व्यक्त करा