“ग्रामदैवताच्या जत्रेची थट्टा की परंपरेचा ऱ्हास?”
“दशावतारी कलाकारांची व्यथा : बदलत्या जत्रेची करुण कहाणी”
सिंधुदुर्ग
कोकण म्हणजे पृथ्वीवरचा एक जणु स्वर्ग आहे . त्याला स्वर्ग म्हणून सुस्वरूप निसर्गाने दीले . त्यात उंचउंच डोंगर , नदया , सुमुद्र , आंबा , काजु गावातील ग्रामदेवतेची मंदीरे . अस एक प्रकारे दिव्य स्वरूप परमेश्वराने प्राप्त करून दिले . प्रत्येकाच्या गावात एक ग्रामदेवतेच मंदीर असतच . आणि ते ग्रामदैवत जागृत राहव , गावातील सर्व भक्तांचे रक्षण कराव , देवाच तेच मंदिरातील मुर्तीमध्ये सतेच राहाव म्हणुन वार्षिक उत्सव म्हणुन तिथी प्रमाणे जत्रौत्सव केला जातो प्रत्येक गावा गावात . आणि एक आनंदाच वातावरण , प्रसन्नता त्या दिवशी प्रत्येक गावातील व्यक्तींवर दिसून येत . जत्रेमध्ये दुकाने , हॉटेल, लहान मुलांचे खेळ असलेली दुकाने , श्रीफळ , केळी , फुलांचे हार , विद्युत रोषणाईने ग्रामदेवतेच मंदीर कस शोभून दिसते .१२ वाजता पालखी सोहळा १ वाजता गणपती , शारदा , आणि सर्वांना आवडणारा संकासुर . यांने एक तास मनोरंजन होई . त्या नंतर २ वाजता रात्र जागवावी आणि देवाचा जागर म्हणून पौराणिक कथेवर आधारीत दशावतारी नाटक होत असत . मी माझ्या बालपणी नाटक पाहिली ती खुप रसिकांची गर्दी असलेली . त्या वेळेचे कलाकार स्टेजवर जाताना रसिकांची गर्दी बाजुला करून स्टेजवर पोचायचे . एवढी प्रचंढ गर्दी असायची जत्रेत नाटक पाहण्यासाठी . मग नाटक करणारे कलाकार ती रसिकांची गर्दी पाहून आनंदीत व्हायचे आणि रंगात राजा यायचा अंगात कलाकाराच्या . काही काही गावात तर पाहिल की नाटक बगण्यासाठी बसायला जागा मिळावी म्हणुन आधिच चटई टाकून जागा अडवून ठेवायचे . एवढी प्रचंढ गर्दी मंदिरात व्हायची . पण सध्याच्या १० ते १२ वर्षाच्या काळात खुप परिस्थिती बदलली दिसु लागली . लोक जत्रेला देवाची जत्रा म्हणुन नाही तर टाईमपास म्हणून जाताना लोक दिसतात . पटापट एकदा देवाला केळी नारळ ठेवायची नायतर घरातील जाणत्या व्यक्तींना सांगायच तुम्हीच ठेवून लवकर बाहेर या आमी बाहेर थांबतो . थोड्यावेळाने या दुकानातून त्या दुकानात फिरायच परप्रांतीय फेरीवाल्यांची दुकाने गाठायची आणि शेवपुरी , आईस्कीम , कोबी मुंच्युरीयन चायनीच खायच मोबाईल मध्ये फोटो , सेल्फी काढायचे आणि पालखी प्रदक्षिणा पूर्ण करण्या आधिच घराची वाट धरायची . मग नाटक सुरू व्होण्याच्या वेळेला पुर्ण सामसुम . लोक घरी जाताना दिसतात म्हणून दुकानवाले पण दुकाने बंद करायला घेतात . मंदिरच्या बाहेर लाईट बंद होताना दिसतात . गर्दी नाहीशी झालेली दिसते . अश्या शांत वातावरणात , स्टेज समोर कोणीच प्रेक्षक नसताना नाटक २ ते ६ वाजेपर्यंत म्हणजे चार तास कराव लागत कलाकारांना त्या देवासमोर . काहि ठीकाणी लोक असतात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच . लोकांना वाटत की ते नाटकवाले पैसे घेतात म्हणून नाटक करतात . अरे पण बाबानु कलाकार होण्यासाठी खुप कष्ठ घ्यावे लागतात . पुराणांचा अभ्यास , संवाद , प्रसंगरूपी गाणी आणि पौराणिक कथा शोधाव्या लागतात . तेव्हा कुठे नाटक रंगात येत . आपली संस्कृती आपण जर नाही सांभाळून ठेवली तर ती एक दिवस लोप पावेल . देवाचा ही कोप होईल . बरीच गावची देवस्थान बंद होत चालली . जत्रा किंवा इतर काही कार्यक्रम गावात होत नसतात . हा देवतेचा कोप म्हणावा लागेल . देव आपल्या साठी कायम जागृत राहून आपल रक्षण करतो . मग आपण एक दिवस त्याच्यासाठी मंदिरात नाही का थांबू शकत आपली काय काम असली की हक्काने देवाला गाऱ्हाणे घालतो . मग त्याच्या जत्रौउत्सावाला आपण का नाही थांबू शकत वर्षातून एकदा . कलाकारा मंडळी घरातून ४ ते ५ वाजता आपल्या घराकडे पाठफिरवत आपल्या संसारावर दुलर्ष करत आपल्या लहान मुलांना घरीच सोडून प्रत्येकाच्या गावात जात असतात . सुंपूर्ण रात्र जागुन देवाचा जागर नाटकाच्या रूपातून करत असातात एकंदरीत कलाकार तुमच्या गावासाठी घरातून निघण्यापासून ते दुसऱ्या दिवशी घरात पोचेपर्यंत १३ ते १४ तास आपले देत असतो . पण आपण गावची मंडळी झोपायला घरी जातो . वर्षातून एक दिवस देवाला देवू शकत नाही . तर ज्यांने तुम्हाला ज्या गावात जन्म दिला त्या देवाला तुम्ही काय मानतात ते विचारात आणा . आपली संस्कृती आता पासुन जर आपण सोडली तर पुढच्या नवीन पीढीला आपल्या ग्रामदेवतेच महत्व काय कळणार . अश्याने देव अजुन कोप करेल आणि आपल्या पासुन दुर जाईल . भक्तांच्या गर्दीने मंदिराला शोभा येते ती रंगोरंगोटी करून नाही . थर्टी फर्स्ट , ऑर्केस्ट्रा , पिकनीक , पार्टी या साठी आपण रात्रभर जागरण करतो . आणि सकाळी उठून आपआपल्या कामी जातो . तस ज्या गावात ग्रामदेवतेच्या आशिर्वादाने आपला जन्म झाला त्याचे आभार मानले पाहिजे आणि त्यांच्यासाठी तरी वार्षीक उत्सवाला थांबण गरजेच असत . काही जण पंढरपुरला प्रचंड गर्दी करून जातात . अनेक तिर्थ क्षेत्रावर आपल कुंटूंब स्पेशल गाडी करून जातात . अरे काय त्याचा उपयोग गावच्या देवाला वेळ द्यायला तुला वेळ नाही आणि जगातील तिर्थयात्रा करून पुण्य पदरी कस पडणार . मग काहीजण म्हणतात एवढी तिर्थस्थळे फिरलो देव दर्शन केल तरी ही सुख नाही. अरे कस मिळणार आपली ग्रामदेवता आणि कुलदेवता जर खुश नसेल तर कुठच्या ही तिर्थक्षेत्राला जावून कितीही दीवे लावले तरी काय उपयोग नाही . म्हणून विचार बदला आणि आपल्या संस्कृती जपा देवासाठी एक रात्र वर्षातून जागरण करा . ते फक्त जागरण नसून तुम्ही केलेली संपुर्ण रात्र सेवा असेल देवाची🙏

