दिवाळी कट्टा स्पर्धा निकाल व बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
रेडी
माऊली युवा प्रतिष्ठान, रेडी च्या वतीने ऑक्टोबर मध्ये घेतलेल्या दिवाळी कट्टा या स्पर्धेचा निकाल बक्षिस वितरण सोहळा शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत रेडी च्या व्यासपीठावर पार पडला.
दिवाळी कट्टा या स्पर्धे अंतर्गत रेडी मध्ये जे बसण्याचे विविध कट्टे आहेत त्या कट्ट्यावरील युवकांनी पारंपरिक मोठा आकाशकंदील लावून तेथील परिसर स्वच्छ करून दिव्यांची आरास व रांगोळी घालून तेथील वातावरण तेजोमय करायचे होते. त्या सोबत किल्ल्याची प्रतिकृती साकारायची होती. त्यानुसार रेडीतील विविध सात संघानी अप्रतिम कलाकृती सादर केल्या होत्या या स्पर्धेत परीक्षण सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी केले होते.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या या सात संघापैकी चौतूरवाडा खळा गावतळे या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रोख रु 5 हजार व चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांक दिवाळी कट्टा म्हारतळे संघाने पटकाविला त्यांना रोख रु 3 हजार व चषक देण्यात आला. तर तिसरा क्रमांक निलेश भाई कट्टा, राऊळवाडी व दिंडी कट्टा, सुकळभाटवाडी या दोन्ही संघाना संयुक्तपणे देण्यात आला, त्या दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रु 2 हजार व चषक देण्यात आला. तर उत्तेजनार्थ म्हणून राणेवाडी संघ, पोलिस स्टेशन रेडी व नारी कट्टा रेडी या संघाना सन्मान चिन्ह व रोख रु 1 हजार देण्यात आले.
यावेळी बोलताना सन्माननीय माजी पंचायत समिती सभापती अजित सावंत व रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या, यावेळी माऊली युवा प्रतिष्ठान त्याचप्रमाणे रेडी ग्रामस्थ ज्या माऊली मंदिर ते गणपती मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत होते, सर्व स्तरावर निवेदन देत होते त्या रस्त्यासाठी आपण देखील ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न करून रस्ता मंजूर करून घेतल्याचे व लवकरच काँक्रीटीकरण केलेला रस्ता गणपती मंदिरापर्यंत होईल असे सांगितले.
तसेच श्री देवी माऊली युवा कला क्रीडा उत्कर्ष मंडळाच्या वतीने चांडाळ चौकडी हे प्रबोधनात्मक सामाजिक संदेश देणारे नाटक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिंबक आजगावकर यांनी केले, प्रास्ताविक चक्रपाणी गवंडी यांनी केले. यावेळी आनंद भिसे, अनंत कांबळी,नामदेव राणे,पराग शिरोडकर,राजेंद्र कांबळी,सागर रेडकर,दादा नाईक,माऊली युवा प्रतिष्ठानचे वैभव आसोलकर, नंदकुमार मांजरेकर,भूषण मांजरेकर, प्रल्हाद रेडकर,ताता नाईक,राजू आडेलकर,रोहन सावंत,प्रदीप बागायतकर, देवीदास मांजरेकर हे उपस्थित होते.

