पिंपरी –
“वंदे मातरम हा प्रेरणादायी मंत्र आहे “असे प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष सिताराम नरके यांनी केले.
वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य म्हणून कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाइन कवी संमेलन “वंदे मातरम्” दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी गुगल मिट (Google Meet )वर देशभक्तीच्या सळसळत्या वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात कवी अमिता जोशी यांनी हृदयस्पर्शी भावनेने सादर केलेल्या “वंदे मातरम्” ने झाली. या मंगलारंभी संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीची ऊर्जा पसरली.
या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती पारितोषिक विजेते, ज्येष्ठ कवी व लेखक मा. सिताराम नरके सर यांनी भूषविले.
कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून मा. निलिमाताई फाटक यांची उपस्थिती लाभली.
या कवी संमेलनातील सर्व सहभागी कवींची कविता, सादरीकरण, आशय आणि मांडणी यांचे सखोल परीक्षण सन्माननीय अतिथी मा. निलिमाताई फाटक यांनी अत्यंत नेमकेपणाने व सौंदर्यपूर्ण भाषेत केले.
त्यांच्या परीक्षणामुळे कवींचा आत्मविश्वास वाढला आणि साहित्यिक दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलनाध्यक्ष मा. सिताराम नरके सर यांनी काव्य, राष्ट्रभावना आणि भाषिक संस्कृतीविषयी आपले अत्यंत प्रेरणादायी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
त्यांनी सर्व कवींच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक केले व साहित्यिक उपक्रम सातत्याने वाढवत नेण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेते — प्रथम क्रमांक- मंजुषा थावरे, द्वितीय क्रमांक (सामायिक)-प्राची देशपांडे व सूर्यकांत भोसले.
सहभागी कवी —सूर्यकांत भोसले, श्रद्धा चटप, नागेश गव्हाड, सुलभा सत्तुरवार, रजनी दुवेदी, प्राची देशपांडे, मंजुषा थावरे, प्रतिमा काळे, स्नेहा पाठक, वंदना इन्नानी, कांचन मुन, राहुल भोसले, अमिता जोशी, योगीता कोठेकर, उमा लुकडे, लक्ष्मीदेवी रेड्डी या कवींनी आपल्या देशभक्तीपर बहारदार रचनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सीमा शिरीष गांधी यांचे आकर्षक सूत्रसंचालन आणि प्रभावी प्रास्ताविक कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले.
देशभक्तीच्या जयघोषात संमेलनाची सांगता झाली.

