You are currently viewing अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर..

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर..

मालवण :

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ , जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नंबर १, तालुका मालवण येथील पदवीधर शिक्षिका श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. रुपये ५०००/- (पाच हजार रुपये) रोख, सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून, सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक ३/३० वाजता केंद्र शाळा आचरे नंबर १ येथे होणार आहे. अशी माहिती श्री सुरेश रामचंद्र गावकर (अध्यक्ष निवड समिती शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६) यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली.

श्रीम. तेंडोलकर यांनी आपल्या ३३वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात बालक, पालक शिक्षक आणि समाज यांच्यासाठी अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवून शाळा समाजात नेली आणि समाज शाळेत आणला. अध्यापन कार्यासोबतच आदर्श ललितलेखन, कवयित्री म्हणून त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाव आहे. सदर निवडीबद्दल श्री सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्याध्यापक , शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांचाही गौरव होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा