*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्वास या देही तोवर*
श्वास या देही,
तोवर जगून घ्यावे
श्वास दिले भगवंताने
स्मरून जावे…..
विसरा भेदभाव सारे
जवळी यावे
एकमेका करू साह्य
संवेदनेस जाणावे….
घडो सत्कर्म हातून
पाऊल उचलावे
सेवेसाठी तत्पर मन
वेदनेस अनुभवावे…
सद्विचार ज्योत पेटता
जागवी अंत:करण
माझे तुझे भेद विसरुनी
एकत्व बघावे….
एकदाच आयुष्य लाभते
करावे सुवर्ण त्याचे
जोवर श्वास या देही
अरुपास त्या स्मरावे.. !!
~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार✍️

