सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना ताकद देण्याची मागणी केली.
जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावन्त व प्रदेश प्रतिनिधी सौ. विभावरी सुकी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक महेश उर्फ बाळू अंधारी, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हापसेकर, सोशल मीडिया प्रदेश सचिव गौरी तेली, युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, कुडाळ मालवण युवक उपाध्यक्ष पल्लवी तारी, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.