You are currently viewing नेतर्डेतील महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

नेतर्डेतील महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

नेतर्डेतील महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

बांदा

नेतर्डे-खोलबागवाडी येथे एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. मयुरी आनंद परब असे या तरुणीचे नाव असून ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी ही बाब घरच्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना माहिती दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर व संगीता बुर्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयुरी ही पेडणे (गोवा) येथे बारावीत शिक्षण घेत होती. तिच्या मागे आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा