सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी प्रवीण भोसले सक्रिय….
पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन सादर
तिरोडा साकव दुरुस्तीचाही मुद्दा अग्रक्रमावर
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या १७ सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. तसेच तिरोडा गावातील साकव दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, याबाबतही त्यांनी लक्ष वेधले.
श्री. भोसले यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सुनील परब, संदीप पाटील आणि निखिल कदम यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मनोज वाघमारे, गोपाळ सावंत आदी उपस्थित होते.

