You are currently viewing 24 तास एक्स-रे टेक्निशियन म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली.

24 तास एक्स-रे टेक्निशियन म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली.

24 तास एक्स-रे टेक्निशियन म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या आठ महिन्यापासून एक्स-रे टेक्निशियन म्हणून निखिल बावकर यांनी रुग्णांना 24 तास उत्कृष्ट सेवा दिली तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यामुळे ते काही दिवसातच संस्थेचे चांगले मित्र बनले त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून त्यांना पुष्प व भेटवस्तू देऊन पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर त्यांच्या जागी नवीन एक्स-रे टेक्निशियन आसिफ सनदि यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही स्वागत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले.
निखिल बावकर हे आता ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे सेवा बजावणार आहेत. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच मनोज सावळे इसीजी टेक्निशियन सुप्रिया नाईक कॅच्युलिटी इन्चार्ज सिस्टर, डॉ. क्रांती, डॉ. प्रिया डॉ.सिद्धेश्वर शुभांगी कट्टीकर प्रथमेश परब सिटीस्कॅन टेक्निशियन, स्वप्निल, कांचन कुंडईकर सिस्टर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा