You are currently viewing आचरे नंबर 1 कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार 

आचरे नंबर 1 कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार

मालवण / आचरा :

बा. ना. बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे नंबर 1 येथे नुकताच कथामाला कार्यकर्त्या शिक्षकांचा वअखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण’ या संस्थेमार्फत शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष स्थानी सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण) हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून श्री अशोक धोंडू कांबळी (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे) हे होते. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश परुळेकर (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), अर्पिता घाडी (उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती), अनिता पाटील (मुख्या. आचरे नंबर 1), सुगंधा केदार गुरव (कार्यवाह कथामाला मालवण), सुरेंद्र सकपाळ (उपाध्यक्ष कथामाला), श्रुती गोगटे (उपाध्यक्षा कथामाला)! तसेच सायली परब, मनाली फाटक, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, नेहा बापट, संजय परब आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अनिता पाटील,सिद्धेश हळवे, शारदा बिसेन, दीपाली खंड गावकर , मीरा बांगर यांचा कथामालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे बाबाराव महादवाड यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री अशोक कांबळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी साने गुरुजी कथामाला मालवण आयोजित कथाकथन स्पर्धा २०२५ मध्ये यशस्वी स्पर्धकांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.

गट क्रमांक १) (१ली /२री ) अनुक्रमे १) विजय गोविंद अमृतवाड ,

२)युक्ता महेश पुजारे,

३) काव्या प्रथमेश घाडी.

गट क्रमांक २(३री/४थी) अनुक्रमे

१) सिद्धी समीर नागले ,

२) पुर्वा सुरेश पाताडे,

३) आरती विष्णू भाटकर.

गट क्रमांक ३(५वी/६वी) अनुक्रमे

१) चिराग केशव सामंत,

२) ज्ञानेश्वरी मिलिंद मेस्त्री,

३) विराज संजय जावीर .

या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

त्यानंतर अशोक कांबळी यांनी विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री सुरेश ठाकूर म्हणाले,”बा. ना. बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे नंबर 1 ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कथामालेची गंगोत्री आहे. याच शाळेत ५३वर्षांपूर्वी कथामालेचे कार्य सुरू झाले. शिक्षक जरी बदलले असले तरी गेली ५०वर्षांपासून या शाळेत कथामालेचे कार्य अविरत सुरू आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. याकरिता या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांना मी धन्यवाद देत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुगंधा केदार गुरव यांनी केले तर अनिता पाटील मुख्या आचरे नंबर 1 यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा