You are currently viewing गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायातून जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल….

गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायातून जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल….

भाजप प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

भाजपच्या माध्यमातून तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

सावंतवाडी
भारताचे कतृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास चा नारा दिला. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारत आत्मनिर्भर योजनेसाठी त्यांनी २० लाख कोटी निधी उपलब्ध करून दिला. सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या माध्यमातून आयोजित या मत्स्य महोत्सवाच्या रुपाने मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न होत आहे. आज फिलिपाईन्स सारखे अनेक देश गोड्या पाण्यातील माशांच्या व्यवसायातून प्रगत झाले आहेत. सिंधुदर्गातील तरुणांचे अर्थकारणही मत्स्यशेती व गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून बदलता येईल. त्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आम्ही भाजपचे सर्व नेत सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आम. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून सिंधुदर्ग जिल्हा हा शतप्रतिशत भाजपच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अलिकडेच झालेला ग्रामपंचायतीतील विजय हा पूढील विजयांची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपच्या सिंधु आत्मनिर्भर अभियान , निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन संस्था, सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या प्रांगणात आयोजित भव्य मत्स्यमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, निलक्रांतीचे अध्यक्ष रविकिरण तोरस्कर, न.प. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सावंतवाडी निरीक्षक राजू राऊळ, प्रभाकर सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, भाजपाचे मत्स्य आघाडीचे प्रमुख चेतनदादा पाटील न.प. गटनेते राजू बेग, माजी सभापती ॲड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, केतन आजगांवकर, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, शहर सरचिटणीस परिक्षित मांजरेकर, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =