You are currently viewing मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

बांदा :

प्रतिनिधी मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी श्रीदेवी माऊलीची पूजाअर्चा, अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा आणि मध्यरात्री आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी जत्रोसवाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती, मानकरी व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा