फोंडाघाटात दत्त जयंतीचा जल्लोष; भजने–दशावतारांनी दुमदुमला परिसर
फोंडाघाट परिसरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उचा हात, हवेली नगर, कानडेवाडी, गडगेवाडी तसेच सखल भागात जत्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. भजने, कीर्तन, दशावतार यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
संध्याकाळी सर्वत्र दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला. भाविकांनी विविध ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. यंदा घटना गुरुवारी आणि विशेष म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी झाल्याने अनेक घरांमध्ये व्रत पाळण्यात आले.
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”च्या जयघोषात फोंडाघाट भक्तिरसात न्हाऊन निघाला.

