You are currently viewing सिंधुदुर्गातील घडामोडींवर रविंद्र चव्हाण यांची सावंतवाडीत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद
Oplus_16908288

सिंधुदुर्गातील घडामोडींवर रविंद्र चव्हाण यांची सावंतवाडीत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद

सावंतवाडी :

नुकत्याच भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वादानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या सावंतवाडीत दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीतील कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर ते सावंतवाडीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या कार्यालयात ते दाखल होणार असून सकाळी साडे नऊ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चव्हाण काय भाष्य करणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा