You are currently viewing भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र; पालक व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी….

भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र; पालक व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी….

_*भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र; पालक व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी……*_

सावंतवाडी

_इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी भोसले नॉलेज सिटीच्या वतीने शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सत्रामध्ये JEE व NEET परीक्षेची माहिती, तयारीची रणनीती, अभ्यास पद्धती, भविष्यातील प्रवेश प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे._

_हे सत्र सर्व पालक व विद्यार्थ्यांसाठी खुले असून नि:शुल्क आहे. योग्य करिअर नियोजन व JEE-NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची दिशा समजून घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात हे सत्र संपन्न होईल. यासाठी कोटा व हैदराबाद येथील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील._

_संस्थेमार्फत सुरू करण्यात येत असलेल्या आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या उपक्रमांतर्गत हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. या अकॅडमीद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील कोचिंग आता सावंतवाडीतच उपलब्ध होणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घेत इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 9422386614 किंवा 7875149717 या क्रमांकावर संपर्क साधावा._

प्रतिक्रिया व्यक्त करा