You are currently viewing राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सन 2025-26 या वर्षातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षाआतील मुले व मुली) क्रीडा स्पर्धा  दिनांक 8 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी दिली आहे.

           राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षाआतील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेमध्ये विविध वजनगटात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागरपूर, नाशिक, पुणे असे महाराष्ट्रातील 8 विभागातून सुमारे 160 खेळाडू व संघव्यवस्थापक, स्पर्धेकरिता पंच असे एकूण 200 व्यक्ती उपस्थिती  राहणार आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याव्दारे खेळाडू व संघव्यवस्थापक यांची निवास, भोजन इ. बाबींची व्यवस्था करण्यात येत आहे.

           राज्यस्तीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन  दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सायं.4 वाजता बॅडमिटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येत आहे. 14 वर्षे वयोगटातील मुला- मुलींच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे सामने पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा