*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम रोही पंचाक्षरी रचना*
*दत्तावतार*
श्रीदत्त मूर्ती
कामना पूर्ती
जन्मे माहुरी
दिगंत कीर्ती
ब्रह्मा श्रीधर
नी महेश्वर
अवतरले
परमेश्वर
श्रीपाद रूप
दत्त स्वरूप
पीठापुरी हे
वाटे अप्रूप
कारंजा ग्रामी
नृसिंह स्वामी
हे यतीरूप
श्रीक्षेत्र धामी
स्वामी समर्थ
टाळी अनर्थ
अक्कलक़ोटी
जीवना अर्थ
त्रिवीध ताप
हरतो पाप
श्री दत्त दत्त
करावा जाप
मागे मंजिरी
कृपा रे करी
वरदहस्त
ठेवावा शिरी.
सौ.मंजिरी अनसिंगकर, बंगलोर
