You are currently viewing दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू; स्थानिक रुग्णांना दिलासा

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू; स्थानिक रुग्णांना दिलासा

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू; स्थानिक रुग्णांना दिलासा

दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय म्हणून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही सुविधा उपलब्ध झाली असून यामुळे डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी आता दूरच्या ठिकाणी जावे लागणार नाही.

या सेवेला प्राधान्याने तालुक्यातील रुग्णांना लाभ मिळणार आहे.

हेल्पलाईन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन डायलिसिस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत जाधव आणि नेफरॉलॉजिस्ट डॉ. प्रकाश घोगळे यांच्याशी चर्चा केली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डायलिसिस सिंधुदुर्ग प्रमुख प्रशांत जाधव आणि दोडामार्ग प्रमुख वेनिशा फर्नांडिस उपस्थित होते.

वेनिशा फर्नांडिस यांनी सांगितले की, विद्युत पुरवठ्यातील अनियमिततेमुळे सोमवारी डायलिसिस सेवा बंद राहील; मात्र मंगळवार ते रविवार ही सेवा नियमित सुरू राहील.

डायलिसिससंबंधी अधिक माहितीसाठी रुग्ण अथवा त्यांच्या नातलगांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील “आरोग्य मित्र” यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युथ हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या अत्यावश्यक सेवेमुळे दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना आरोग्याच्या नव्या आशा मिळाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा