You are currently viewing शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ले
रामपुरुष युवा मित्रमंडळ शिरोडा–परबवाडा यांच्या वतीने कै. नीरज कोरगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पार पडणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रमांतर्गत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, रक्ताच्या सातत्याने भासणाऱ्या गरजेनिमित्त अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विठोबा परब (मो. ९४२३८७८३१५), प्रथमेश परब (मो. ९४०५२२७४०७) व देऊ परब (मो. ८५५२९७५९१५) यांच्या संपर्क साधावा. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा