*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय…*
उठे रामना पायठे माय घुरू घुरू दये
घास टाकता टाकता टप टप घाम गये
जड जाये घट्या भारी माय म्हने मंग गानं
असं करता करता सरी जाये ते दयनं..
पीठं भरी टाके मंग पत्तरना त्या डबाम्हा
झाडीझुडी पुसी टाके घट्या आजूनाबाजूना
झुंजूमुंजू व्हये मंग धरे हातम्हा झाडनी
सडासारवन व्हये मंग रांगोई काढानी…
थेंब रांगोईना टाके मोजिसनी आंगनम्हा
चार बोटे ती फिराये त्यानावरं ती रंगना
दिसे साजरं आंगन मंग पेटाडे ती चुल्हा
लाकडेसनं उजाये पानी तापी जाए बोला..
आंग धोईचोई नेसे नऊवार ती लुगडं
कपाये कुकुनी ती चिरी नेटकी ती अवघड
अशी लक्षुमी ती सजे मंग चहानं आंधन
दूध तपाडे बाजूले भानशिनवर बघोनं…
चुल्हा पेटे धडधड थपथप त्या भाकरी
तिना हातले हो चव व्हती भलतीज न्यारी
कोथमिर कढीम्हानी कशी घमघम करे
खुडा खलबत्ताम्हाना लाय तोंडम्हाज फिरे…
तिना खिचडीना वास गल्लीभर परमये
घुसताज घरम्हा हो तोंड कितलं खवये
उडिदना पापड त्या इस्तोम्हा त्या टरटर
तये गवारींन्या शेंगा चटकमटक करकर..
याद करी करी आते येस एकेक आठव
व्हता जमाना चांगला लागे कसं घवघव
मायबापनी हो सर नही येत हो कोनले
याद करी लेवो आनि लेवो समजावी मनले.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
