You are currently viewing पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 22 ते 23 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व ओरोस जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ: समिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. दुपारी 3 वाजता केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी. 4.30 वाजता केसरी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

         शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता केसरी जि. सिंधुदुर्ग येथून गोवाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा