*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कां? गरीबांची भाकर!*
धुमसत्या चुलीत
आग पेटवित
बसे माय गरीबाची
भाकरी थापीत
मिणमिणता दिवा
असे सोबतीला
रातदिस कष्ट करुन
पीठ भाकरीला
मोलमजुरी करुन
बाप राबराबे शेतात
पोटापुरता दाणापाणी
कसेबसे आणती घरात
फाटकेच घोंगडे
फाटकीच वाकळ
उसवलेली रजई
त्यावर रात सरे गबाळ
पैका नसे घरात
चार पोरे सोबतीला
कसेतरी पेजभाकर
लाड त्यांचे पुरवायला
जगी पाहती कौतुक
सोहळे आजूबाजूस
दोघांच्याही डोळा पाणी
शिक्षणाची न धरली कास
गरीबी पूजली जन्मभर
आयुष्याच्या सोबतीला
नाही शिक्षणाची आस
पश्चात्ताप नशिबी आला!
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका
