You are currently viewing राजघराण्याचा मतदानात सहभाग
Oplus_16908288

राजघराण्याचा मतदानात सहभाग

विजयाबाबत श्रद्धा भोसले यांचा आत्मविश्वास

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील राजघराण्याने आज सकाळी खासकीलवाडा येथील मतदान केंद्रावर सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, उर्वशी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदानानंतर बोलताना श्रद्धा भोसले म्हणाल्या की, “काही झाले तरी या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या मुद्द्यावर आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील,” असा त्यांना विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सर्व सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा