*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती स्त्री…*
ती माहेरी जाते तरी ही
तिथे तिचं चीत्त लागत नाही
चार दिवसांच्या वर ती
एक दिवसही जास्त रहात नाही
पोहचल्याचा निरोप देताना
लवकरच येते सांगायला विसरत नसते
कधी चार दिवस जातील
याची ती वाट पहात असते
माहेरी गेल्यावरही तिच
सारं लक्ष सासरचीच असतं
माहेरी असल्यावर ही
तिथे तिला निवांपण नसतं
दिवसातून तिचा
चार वेळा फोन असतो
तिच्या विचारण्यात ही
काळजीचा सुरू दिसतो
हे इथे ठेवलंय ते तिथं ठेवलंय
पुन्हा पुन्हा ती सांगत असते
तेच तेच सांगायला ती
जराही कंटाळत नसते
इकडून फोन नाही केला की
तिकडून फोनवर फोन सुरूच राहतो
ती घरात नसल्याने जणू
घरात वनवास दिसतो
माहेर तिचं श्रीमंत असल तरी
सासर तिला आपलसं वाटतं
आपल्या घरातच तिला
खरं सुख भेटत
कारण…
संसाराचा रहाटगाडा
तिनेच चालवावा
संसार कसाही असला तरी
तिचा आनंद डोळेभरून पहावा
दिवसभर राबून ही
वेदना तिच्या ती सांगत नाही
तिच्याशिवाय देवापुढे
दिवाही लागत नाही
सासरच्या गोतावळ्यात
आयुष्य तिचं सरत असतं
आपल्या माणसाशिवाय
इतरत्र कोठेही मन तिचं लागतं नसतं
खरचं
माहेर कितीही गोड असल तरी
तिला सासरचीच ओढ जास्त असते
म्हणून अंगणातली तुळशी ही
तिची वाट पाहत असते
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
