*ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी कुमार स्वामी तर सचिवपदी तेजस साळुंखे यांची निवड*
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुका शाखा अध्यक्षपदी श्री.कुमार स्वामी तर सचिपदी श्री.तेजस साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुका शाखेच्या पुनर्बांधणीसाठी सभा नुकतीच संपन्न झाली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्याची पुनर्बाधणी करण्यासाठीची बैठक वैभववाडी येथे राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव श्री. संदेश तुळसणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला वैभववाडी तालुका शाखेचे जुने पदाधिकारी व काही नवीन सदस्य उपस्थित होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक संघटन व ग्राहक जागृती वाढीसाठी तालुकावार शाखा स्थापना व पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैभववाडी तालुका शाखेच्या पुनर्बांधणीसाठी ही विशेष सभा आयोजित केली असून सर्वांशी चर्चा करून नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावी,
स्थानिक नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी
तालुका शाखा सक्षम करणे आणि गाव तेथे संस्थेचा कार्यकर्ता उभा करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांनी केले. त्यानंतर सर्वसंमतीने वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष– कुमार स्वामी
उपाध्यक्ष- मंगेश चव्हाण
संघटक- तेजस आंबेकर
सचिव- तेजस साळुंखे
सहसंघटक- इंद्रजित परबते
सहसंघटक महिला- संपत्ती चौगुले
सहसचिव- विद्या पाटील
कोषाध्यक्ष- सुधाकर पुरीबुवा
प्रसिद्धी प्रमुख- मंदार चोरगे
सल्लागार- अॅड.प्रताप सुतार
सल्लागार- एस.पी.परब
यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष कुमार स्वामी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नुतन अध्यक्ष कुमार स्वामी यांनी ग्राहक जनजागृतीचे काम राज्य व जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका शाखा पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्राधान्याने हाती घेणार असल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक तेजस साळुंखे यांनी केले तर आभार जयवंत पळसुले यांनी मांडले.
