You are currently viewing मणेरी बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

मणेरी बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

मणेरी बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

दोडामार्ग
तालुक्यातील मणेरी, नूतनवाडी येथील ५४ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना सासोली हेदुस ते बडगेवाडीकडे जाणाऱ्या बंधाऱ्याजवळ घडली

मृत महिलेचे नाव सुधा नारायण रेडकर (वय ५४, रा. मणेरी, नूतनवाडी) असे आहे त्या मनेरी गावची जत्रा असल्याने
​जत्रोत्सवासाठी बाहेर पडल्या होत्या मणेरी येथील श्री सातेरी देवीच्या २३ नोव्हेंबर रोजी असलेल्या जत्रोत्सवासाठी जाते असे सांगून सुधा रेडकर या सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या.

​घरी परतल्या नाहीत:
त्या रात्री घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
​मृतदेह आढळला: मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास सासोली हेदुस ते बडगेवाडी जाणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस, डाव्या दिशेला एका लाकडाला अडकलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत पोलिसांत नोंद करून या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याबाबत

​फिर्याद विठ्ठल नारायण रेडकर (वय ६४, रा. मणेरी, नूतनवाडी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
​दोडामार्ग पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली असून, घटनेच्या अधिक तपास करत असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा