You are currently viewing सावंतवाडीत भाजपची भव्य प्रचारसभा

सावंतवाडीत भाजपची भव्य प्रचारसभा

सावंतवाडीत भाजपची भव्य प्रचारसभा

रविंद्र चव्हाण व नितेश राणे यांची उद्या उपस्थिती

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत असून भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक जिल्ह्यात दाखल होत असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील गांधी चौक येथे भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे.

या सभेला भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय आ. रविंद्र चव्हाण तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व २१ प्रभागांतील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हे दोन्ही नेते सावंतवाडीत दाखल होत आहेत.

सभेत प्रदेशाध्यक्ष तसेच पालकमंत्री शहरासाठी भाजपचे विकास व्हिजन सादर करतील आणि आगामी कामकाजाबाबत मार्गदर्शन करतील. भाजपच्या स्थानिक उमेदवारांकडून शहराचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो याबाबतही नागरिकांना माहिती दिली जाईल.

या महत्त्वपूर्ण सभेला सावंतवाडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या स्थानिक प्रचार समितीकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा