सावंतवाडी / मळगाव:
कै.प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिर मळगाव आयोजित व डॉ.अरविंद खानोलकर कुटुंबीय पुरस्कृत स्व. डॉ.सौ.मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कुमारी गौरी राजन गावडे, (जिल्हा परिषद शाळा कास नंबर १) व मोठ्या गटात प्रांजल सतीश तेरसे (कुडाळ हायस्कूल कुडाळ) प्रथम क्रमांकच्या मानकरी ठरल्या.
पाचवी ते सातवी गटात कुमारी सर्वेक्षा नितीन ढेकळे (यशवंतराव भोसले इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी) हिने द्वितीय व कुमारी दूर्वा गोपाळ नार्वेकर (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) हिने तृतीय क्रमांक मिळवला. गार्गी किरण सावंत (शांतिनिकेतन स्कूल सावंतवाडी) व स्वरा कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आठवी ते दहावी मोठ्या गटात कुमारी तनिष्का प्रमोद राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) द्वितीय तर अस्मि प्रवीण मांजरेकर (आरपीडी हायस्कूल सावंतवाडी) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कुमारी दिव्यल दिनेश गावडे व मैथिली मनोहर सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
सदर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी तथा प्रायोजक उद्घाटक डॉक्टर मिलिंद अरविंद खानोलकर व डॉक्टर सौ अपर्णा मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते स्व.डॉ.सौ. मालती दत्तात्रय खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी वाचन मंदिरचे अध्यक्ष श्री महेश खानोलकर उपस्थित होते. सदर उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.सौ. अपर्णा खानोलकर यांनी स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजक, विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घ्यावा असे सांगून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोग बक्षीस प्रमाणपत्र ग्रंथ भेट व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर मुलांना स्पर्धेसाठी जाण्या येण्याचा एसटीचा खर्च व अल्पोपहार देण्यात आला.
सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. एन. बी. कार्वेकर सौ ललिन तेली, श्री शंकर प्रभू, श्री किशोर वालावलकर यांनी केले. यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना परीक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी वाचन मंदिरचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. गोपाळ नार्वेकर, कु. जान्हवी अमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार वाचन मंदिरच्या कार्यवाह स्नेहा महेश खानोलकर यांनी मानले.
