You are currently viewing बांदा नट वाचनालयात 6 मार्च राेजी निबंध स्पर्धेचे आयाेजन..

बांदा नट वाचनालयात 6 मार्च राेजी निबंध स्पर्धेचे आयाेजन..

बांदा
येथिल नट वाचनालयात श्री अंकुश रामचंद्र माजगावकर व परीवार पुरस्क्रुत कै.परशुराम लाडु नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ निबंध स्पर्धा शनिवार दिनांक 6 मार्च 2021 रोजी सकाळी 10:30 वा. आयाेजीत करण्यात आली आहे. हि स्पर्धा शालेय दाेन गटात हाेणार आहे.
पहीला गट इ. 5 वी ते 7 वी व दुसरा गट इ 8वी ते10वी असा ठेवण्यात आला आहे. इ 5वी ते 7 वी साठी विषय 1) स्वच्छतेचे महत्व, 2) मला आवडलेले पुस्तक शब्द मर्यादा 500 शब्द वेळ 1 तास , 8 वी ते 10वी गटासाठी विषय 1) समाजाच्या द्रुष्टीने माझी कर्तव्ये, 2) कराेना काळातील माझे अनुभव शब्द मर्यादा 700 श्ब्द वेळ- 1तास दाेन्ही गटातील स्पर्धकानी काेणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे.

ही स्पर्धा सावंतवाडी व दाेडामार्ग तालुका मर्यादीत राहील. ही स्पर्धा बांदा नट वाचनालयात हाेणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्धी, विद्यार्धिनिनी सहभागी हाेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन बादां नट वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष एस. आर. सावंत यानी केले आहे. स्पर्धकानी व स्पर्धक शाऴानी आपली नावे वाचनालयात दि. 25 फेब्रुवारी पर्यत द्यावीत. हि स्पर्धा शासनाचे नियम व साेशल डिस्टसिंग ठेवुन घेण्यात येणार आहे. विद्यार्धानी मास्क लावुन उपस्थित रहावे. असे आवाहन उपाध्यक्ष सुभाष माेर्य़े यानी केले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा