You are currently viewing शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसच्या वाटेवर…

शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसच्या वाटेवर…

शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट हे लवकरच स्वगृही म्हणजेच काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत असे खात्रीलायक वृत आहे. अभय शिरसाट हे पुर्वी काँग्रेस मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी फार चांगले काम केले होते. परंतू नारायण राणे यांच्या काॅग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना उपजिल्हा प्रमुख पद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता परंतू आता काँग्रेस पक्षात आता ते प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत संवाद मिडियाच्या हाती आले आहे.

आज मंत्रालय येथे त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू खासदार राजीवजी सातव तसेच माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यांच्या सोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे,उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख,उपाध्यक्ष विजय प्रभू,जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर उपस्थित होते. लवकरच ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =