*मॉरिशस मधील मराठी गायकास संस्कृती संवर्धन पुरस्कार*
पिंपरी
कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने, मॉरिशसमधील मराठी गायक व विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी संस्कृती संवर्धनाचे काम करणारे, मॉरिशस नॅशनल टीव्हीचे वरिष्ठ निर्माता अर्जुन पुतलाजी यांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्या हस्ते संस्कृती संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, कासारवाडी दत्त मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त शिवानंद स्वामीमहाराज, ह. भ. प. रोहिदासमहाराज हांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रम बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात संपन्न होणार आहे. सत्कारानंतर लगेच मॉरिशसमधील कलाकारांचा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी दिली आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
