कसाल येथे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न..

कसाल येथे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न..

कसाल

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने सिद्धिविनायक मंगल कार्यालय कसाल येथे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मेळाव्यात १०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते.

यावेळी साईकृपा अपंग व्यक्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी सिंधुदुर्गातील दिव्यांग बांधव व यांच्या संघटनांनी २६ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.

यावेळी माजी आमदार मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित राहून २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा