*मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘विज्ञान रथम् ला’ उत्स्फूर्त प्रतिसाद*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 18- 11- 2025 रोजी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे ‘विज्ञान रथम्’ या उपक्रमाअंतर्गत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब हर हायनेस शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सि.जि.शि.प्र.मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत,इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट श्रीम.मृणालिनी कशाळीकर, सेक्रेटरी श्रीम.भारती देशमुख, कॉर्डीनेटर श्रीम. सायली प्रभू , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर तसेच इनरव्हीलचे अन्य सदस्य उपस्थित होते.
दक्षिण भारतातील ग्रामीण भागात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांची विज्ञानाशी मैत्री व्हावी व त्यायोगे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे जीवनातील महत्त्व अधिक सखोलपणे उमगावे या उद्देशाने विज्ञान रथम हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जातो. मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल साठी आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री नवीनकुमार सर व श्री. सदिशकुमार सर यांनी केमिकल रिएक्शन ,फिजिकल रिएक्शन, सिंथेसिस, डीकंपोझिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, रेडॉक्स रिएक्शन, ध्वनीचे कंपन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन, नॉर्मल रिफ्लेक्शन ,रिफ्रेक्शन, हेलियम गॅस मुळे होणारे आवाजातील बदल इत्यादी प्रयोग विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि विज्ञान रथम् टिमचे आभार मानले.
