*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस सर*
मेघ दाटले अंबरी
बरसल्या सरीवर सरी
पावसात ओली
चिंब झाली
ओलेत्याने धरा सजली
भिजताना ती
उमलत होती
शहारताना बहरत होती
बहरताना लाजत होती
लाजून चिंबचिंब होत होती
रिमझिमता बावरा ओल्या स्पर्शात रमला
भिजत रुजत मनात
गेला
भिजवले माझ्याच
अंतरंगात मला
कविता रुजली फुलली
माझ्या कवितेच्या अंगणात
अंगणातला पाऊस कवितेत येताना
कवितेची अक्षरे ओली झाली
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
