You are currently viewing श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण चरणी नतमस्तक होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण चरणी नतमस्तक होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

*श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण चरणी नतमस्तक होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ*

*पारंपरिक मच्छिमारांच्या मुळावर येणाऱ्या पर्ससीन धारकाला सत्ताधाऱ्यांकडून मालवणात उमेदवारी- वैभव नाईक*

मालवण

मालवण नगरपरिषद निवडणूकिसाठी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पुजा प्रमोद करलकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ आज देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या चरणी श्रीफळ ठेवून नतमस्तक होत, विजयाचे साकडे घालून करण्यात आला.प्रचार शुभारंभाला मालवण शहरातील पदाधिकारी शिवसैनिक व मालवण शहरवासीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विजयाच्या संकल्पाने संपन्न झालेल्या या प्रचार शुभारंभानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयश्रीचा ध्येयविधी घेऊन प्रचाराला उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उच्च शिक्षित,आधुनिक विचारसरणीचे,तडफदार ,चारित्र्यवान आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा व अनुभवी जेष्ठ उमेदवार मैदानात उतरविले असून त्यांना शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, अवैध धंदे करणाऱ्यांना सत्ताधारी पाठीशी घालत असून पारंपरिक मच्छिमारांच्या मुळावर येणाऱ्या पर्ससीन मासेमारी करणाऱ्याला मालवणात सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी दिली आहे. जर सत्तेत असलेले लोक पर्ससीन धारकांना उमेदवारी देत असतील, तर पारंपरिक मच्छिमारांना न्याय कोण देणार? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला असून ते म्हणाले,भाजपा- शिंदे शिवसेना यांना उमेदवार मिळत नव्हते मात्र महाविकास आघाडीने मालवण नगरपरिषद निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.आम्ही सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. ते कोणतीही ठेकेदारी न करता जनसेवा करतील. नगरपरिषदमध्ये आपला व्यवसाय करणार नाहीत. त्यामुळे जनतेने आमच्या प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी रहावे.आमची महाविकास आघाडी भक्कम असून आमिषाला बळी पडणारे आमचे उमेदवार नाहीत. गेल्या वर्षभरात शहराची दयनीय अवस्था झाल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केला. नगरपरिषदेत शंभर कोटी निधी पडून असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,नितीन वाळके,तालुकाप्रमुख दिपा शिंदे,नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार सुहास ओरसकर, तपस्वी तुळशीदास मयेकर,महेश विश्वनाथ जावकर,महेंद्र सुदाम म्हाडगुत,पुजा पृथ्वीराज जोगी,संदेश रामचंद्र कोयंडे, उमेश पुरुषोत्तम मांजरेकर,अनिता पॉली गिरकर, ॲड.अमृता अरविंद मोडकर,ॲड. सुमित काशिनाथ जाधव, उमेश अरविंद चव्हाण, योगिता योगेंद्र गांवकर, वृंदा गजानन गवंडी, स्मिता संतोष सरमळकर, तेजस मोतीराम नेवगी, गौरी तुळशीदास मयेकर,माधुरी अन्वय प्रभू, रूपाली जेम्स फर्नांडीस, निलेश सुधाकर दुदवडकर, राधिका सुनील मोंडकर तसेच प्रमोद करलकर,नंदू गवंडी, बाळू अंधारी, अरविंद मोंडकर,निनाक्षी शिंदे, आप्पा चव्हाण,रवी तळाशिलकर,बाळा मिटकर, योगेंद्र गावकर,अन्वय प्रभू, किशोर गावकर, सोमनाथ लांबोर,अक्षय रेवंडकर,गौरव वेर्लेकर,किरण वाळके, कविता मांजरेकर,रूपा कुडाळकर,सचिन मालवणकर,महेश शिरपुटे,दीपक कदम,सिद्धेश मांजरेकर,विघ्नेश मांजरेकर,बाबलो मांजरेकर,पॉली गिरकर,अमोल वस्त,अमोल सावंत,मनोज मोंडकर,तृप्ती मयेकर, यज्ञेश्वर गवंडी,प्रणाली गवंडी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा