You are currently viewing सावंतवाडीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मतदार जनजागृती पदयात्रा
Oplus_16908288

सावंतवाडीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मतदार जनजागृती पदयात्रा

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत या पदयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली.

शहरातील जनरल जगन्नाथ भोसले शिवउद्यान यांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर सेल्फी स्टँडवरील अनावरण सोहळाही पार पडला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वज फडकवून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

पदयात्रेने मिलाग्रीस हायस्कूल चौक, सालईवाडा रस्ता, जयप्रकाश चौक, गांधी चौक, मेन रोड मार्गे नगरपरिषद कार्यालय समोरील कॉलेज रोड, रामेश्वर प्लाझा मार्गे जनरल जगन्नाथ भोसले शिवउद्यान मार्गक्रमण केले.

या उपक्रमात श्री पंचम खेमसावंत महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थितांशी संवाद साधत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील, सहाय्यक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, वैभव कुमार अंधारे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा